‘हिंडाल्को’चा तिमाही नफा 3074 कोटींवर
06:08 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
जून तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश
Advertisement
नवी दिल्ली :
आदित्य बिर्ला समूहाची कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीजने मंगळवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. हिंडाल्कोचा नफा जूनच्या तिमाहीत 25.2 टक्क्यांनी वाढून 3,074 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हिंडाल्को इंडस्ट्रीजने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीने एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2,454 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता.
Advertisement
फाइलिंगनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 57,437 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी 53,382 कोटी रुपये होते. हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ही आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी आहे. हिंडाल्को ही 26 अब्ज डॉलरची कंपनी आहे. हिंडाल्को ही कमाईनुसार जगातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम कंपनी आहे आणि जगातील दुसरी सर्वात मोठी कॉपर रॉड उत्पादक (चीन बाहेर) आहे.
Advertisement