For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमांशू परबचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश

04:22 PM Jun 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
हिमांशू परबचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश
Advertisement

कुडाळ/ वार्ताहर
कुडाळ - पडतेवाडी येथील पांडुरंग शेठ पूर्व प्राथमिक शाळेचा विद्यार्थी हिमांशू दिपक परब याने ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवित सिल्व्हर मेडल पटकाविले. डि.सी. ए. स्पर्धा परीक्षा २०२६ मध्ये हिमांशूने १४८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ३ रा क्रमांक मिळविला. तसेच भारत टॅलेंट सर्च या परीक्षेतही त्याने ११६ गुणासह कुडाळ केंद्रात ३ रा क्रमांक,तर जिल्हा गुणवता यादीत १० वा क्रमांक मिळविला. गुरुकुल व अन्य शालेय स्पर्धामध्येही त्याने चांगले गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या या यशामध्ये सौ.अनघा मर्गज व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. कुडाळ तालुका केमिस्ट संघटनेचे सेक्रेटरी आणि व्यावसायिक दिपक परब व स्वस्तिक फॅशन ज्वेलरीच्या मालक दिव्यश्री परब यांचा हिमांशू हा मुलगा होय.

Advertisement

Advertisement
Tags :

.