For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल गॅस सिलिंडर दरात वाढ

03:11 PM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल गॅस सिलिंडर दरात वाढ
Advertisement

गोव्यात हॉटेल्स, उद्योगांवर परिणामाची शक्यता :चहा, कॉफी व इतर खाद्यपदार्थांचे दर वाढले

Advertisement

पणजी : काल शुक्रवार 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर रु. 993 अशा मोठ्या रक्कमेने वाढवण्यात आल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटवाल्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्याचे दुरगामी परिणाम गोवा राज्यातील हॉटेल व इतर उद्योग, व्यवसायावर तसेच पर्यटनावर सुरु झाले आहेत आणि पुढेही होणार आहेत. या वाढत्या दराच्या सिलिंडरमुळे हॉटेल्समधील चहापासून इतर सर्व अन्न - खाद्यपदार्थांचे दर प्रभावित झाले असून ग्राहकांनाही त्याचा फटका बसणार आहे. व्यावसायिक सिलिंडरची अशी भरमसाट दरवाढ हॉटेल्स चालकांनी कधीही पाहिली आणि अनुभवली नव्हती. गोव्यात पर्यटन व हॉटेल्स हे दोन्ही व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. अनेक प्रमुख हॉटेल्समध्ये एक कप चहा दर रु. 20 ते 25 झाले असून इतर पदार्थांचे दरही वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेर हॉटेल्समध्ये चहा - पाणी करणाऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

हॉटेल्स व्यावसायिकांवर संक्रात

Advertisement

मागील काही महिन्यांच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नाही म्हणून अनेक लहान हॉटेल्स बंद करण्याची पाळी अनेकांवर आली. आता तर न परवडणाऱ्या भरमसाट किंमतीने व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने पुन्हा एकदा हॉटेल्स व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. काही हॉटेल्सनी आता आठवड्यातून एक - दोन दिवस व्यवसाय बंद ठेवायचे ठरविले असून या दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडला असल्याची चिन्हे दिसत आहेत.

पर्यटकांनाही भार सोसावा लागणार

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग केल्यामुळे त्याची किंमत रु. 3000 च्या पार गेली आहे. राजधानी दिल्लीत त्याचा दर रु. 2078 होता. तो आता रु. 3071 झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे विवाह, वाढदिवस इत्यादी मधील जेवणावळीचे दर वाढणार असून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील या दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.

Advertisement
Tags :

.