For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुस्लीम देशातच हिजाबवर बंदी

06:25 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुस्लीम देशातच हिजाबवर बंदी
Advertisement

ताजिकिस्तानमध्ये मोठ्या दंडाची तरतूद

Advertisement

वृत्तसंस्था/ दुशांबे

मुस्लीमबहुल देश ताजिकिस्तानमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ताजिकिस्तानच्या संसदेने हिजाबवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 60 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने हे पाऊल देशात धर्माच्या जाहीर प्रदर्शनाला रोखण्यासाठी उचलले आहे.

Advertisement

ताजिकिस्तानात हिजाबचा वापर रोखण्यासाठी कायदा आता लागू करण्यात आला असला तरीही देशात यावर दीर्घकाळापासून अनधिकृत बंदी होती. हा कायदा प्रामुख्याने हिजाब किंवा इस्लामिक हेड स्कार्फ तसेच इस्लामिक कपड्यांच्या अन्य पारंपरिक पेहरांवर अधिक लक्ष केंद्रीत करतो.

दोन वर्षांपूर्वी देशाची राजधानी दुशांबेमध्ये काळे कपडे विकण्यावर बंदी घालण्यात आली होती. अधिकृत हिजाब बंदीची अफगाणिस्तानातील इस्लामिक विद्वान आणि मौलवींची संस्था तसेच अमेरिकन-इस्लामिक संबंध परिषदेकडून निंदा करण्यात आली आहे. 2015 मध्ये अध्यक्ष इमोमाली रहमान यांनी हिजाब विरोधात आंदोलन चालविले होते.

तर धार्मिक कमिटीचे अध्यक्ष सुलेमान दावलत्जोदा यांनी मुलांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलांची सुरक्षा, विनाकारण होणारा खर्च रोखणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. ताजिकिस्तान 1994 पासून इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षत्वाच्या नियंत्रणात आहे. 2016 मध्ये देशाच्या मतदारांनी घटनात्मक बदलांना मोठे समर्थन दर्शविले होते. यामुळे रहमोन यांना शासन चालविण्याची अनुमती मिळाली होती.

Advertisement
Tags :

.