कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामार्ग अडकला वाहतूक कोंडीत

11:22 AM Sep 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

घरगुती गणेश विसर्जन पूर्ण करुन कोकणवासियांचा परतीचा प्रवास मंगळवारी रात्रीपासूनच सुरू झाला असला तरी बुधवारी सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा प्रचंड ओघ उसळल्याने चिपळूण परिसरात दुपारपर्यंत कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. उड्डाणपुलासाठी सुरू असलेले काम, बहादूरशेखनाका येथील वाहतूक नियोजन यामुळे वाहनांच्या थेट पॉवरहाऊसपर्यंत रांगा लागल्या होत्या.

Advertisement

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासियांच्या अस्मितेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच.

यावर्षी 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यावर्षीही मोठ्या संख्येने कोकणवासीय दाखल झाले होते. सहा दिवस उत्सवात गेल्यानंतर मंगळवारी घरगुती गणेशाचे विसर्जन झाले आणि कोकणवासियांचा परतीचा प्रवास रात्रीपासूनच सुरू झाला. मात्र बुधवारी या प्रवासात दुपारपर्यंत चिपळुणात महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम वर्षानुवर्षे सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच शिवाजीनगर एसटी बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि बहादूरशेखनाका येथे कराड-गुहागर मार्गाने येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करताना काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पोलिसांना थांबवावी लागत होती.

अगोदरच महामार्ग उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम आणि त्यातच बहादूरशेखनाका येथील वाहतुकीचे नियोजन यामुळे मुख्य मार्ग संकुचित झाल्याने वाहतुकीचा भार सर्व्हीस रोडवर पडला. त्यामुळे बहादूरशेखनाका ते पाग पॉवरहाऊसदरम्यान वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सर्व्हीस रोड मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गच्च भरल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहरातील नागरिकांनीही महामार्गावरील वाहनांच्या रांगा पाहून अंतर्गत रस्त्यांनीच प्रवास केला.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article