For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसआयपीतून आतार्पंयत सर्वाधिक रक्कम काढली

06:22 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसआयपीतून आतार्पंयत सर्वाधिक रक्कम काढली
Advertisement

गुंतवणूकदारांनी 14,367 कोटी रुपयांचा समावेश

Advertisement

नवी दिल्ली :

जुलैमध्ये म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) खात्यांमधून एकूण 14,367 कोटी रुपये काढण्यात आले. म्युच्युअल फंड खात्यांमधून पैसे काढण्याची ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे काढण्याचा कल दिसून येत आहे. हे गुंतवणुकीतील वाढीपेक्षा जास्त आहे.

Advertisement

आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीझ यांच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर नफा कमावल्यानंतर मोठ्या प्रमाणात नफा वसूल केल्यानंतर पैसे काढण्यात आले आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचाही गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला.

Advertisement
Tags :

.