For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | साताऱ्यात अतिक्रमण मोहिमेत हायव्होल्टेज ड्रामा! शाहूपुरीत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

05:27 PM Apr 29, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात अतिक्रमण मोहिमेत हायव्होल्टेज ड्रामा  शाहूपुरीत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Advertisement

                             साताऱ्यात अतिक्रमण हटाववेळी तणाव

Advertisement

सातारा : शाहूपुरीतील आझादनगर येथे मंगळवारी सकाळपासूनच अडसुळ कुटुंबाचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम राबवण्यात आली. त्या मोहिमेवेळी अडसूळ कुटुंबातील काही सदस्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलीस आणि अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकासोबतही वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

पालिकेच्या मालकीच्या जागेत राहत असल्याने पालिकेने नोटीस बजावून अडसूळ कुटुबियांना अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे सुचित केले होते तर अडसुळ कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून आम्हाला सात दिवसांची मुदत द्यावी, कागदपत्रांची पूतर्ता करण्यासाठी अशी विनंतीकेली होती.

Advertisement

दरम्यान, अडसूळ कुटुंबाने सांगितले की, आम्ही चाळीस वर्षापासून राहत आहोत. आम्हाला बेघर करु नका, आमची लहान लहान मुल घेवून कुठे आम्ही जाणार, आमचे पूनर्वसन करा, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे
शाहूपुरी शाहूपुरीतील आझादनगर येथील ४० वर्षे जुने अतिक्रमण मंगळवारी पालिकेने काढून टाकले.

निवेदनाद्वारे केली होती. सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागास पालिकेच्या बरिष्ठांकडून सुचना मिळताच तेथे बागेचे आरक्षण असल्याकारणाने बाग सुशोभिकरण करण्याच्या कामास सुरुवात करण्याच्या अनुषंगाने कारवाईसाठी
पथक मंगळवारी सकाळी तेथे पोहचले. पथक पोहचून कारवाईला सुरुवात करताच अडसुळ कुटुंबाने विरोध केला. दुपारी त्या कुटुंबातील काहींनी अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी लगेच अटकाव केला.

Advertisement
Tags :

.