Satara Breaking | साताऱ्यात हाय व्होल्टेज' ड्रामा !चौथ्या मजल्यावर निर्णयाची प्रतीक्षा, बाहेर तणावाचे वातावरण; जिल्हा परिषदेत काय घडलं?
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 'फिल्डिंग
सातारा - धावपळ, पळापळ आणि अचूक टायमिंग—याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी राजकीय हालचालींना वेग आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे दिवसभर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या इमारतीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला भाजपचे सदस्य ट्रॅव्हल्समधून दाखल झाले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनातून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीतून बापूसाहेब शिंदे, संदीप मांडवे, अनिल देसाई, कामेश कांबळे हे सुरुवातीला पोहोचले.यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले.
चौथ्या मजल्यावर अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती. मतदानास अवघी दहा मिनिटे शिल्लक असताना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्याकडे भाजप तसेच राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले.या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र दिसून आले.