Shashikant Shinde | शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात साताऱ्यात हायव्होल्टेज ड्रामा; 'या' ६ मोठ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं!
साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जनतेच्या प्रश्नांवर महामोर्चा
सातारा ( इम्तियाज मुजावर ) -साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज विविध जनतेच्या प्रश्नांवर जोरदार महामोर्चा काढण्यात आला. महिलांवरील वाढते अत्याचार, पेपरफुटी प्रकरणे, महागाई, भ्रष्टाचार, इंधन दरवाढ तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्काजाम आंदोलन केले.
या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.