महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरसंबंधी आज उच्चस्तरीय बैठक

06:55 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ‘एनएसए’ डोवाल यांची उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवार, 16 जून रोजी एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे. या बैठाकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उच्च अधिकारी उपस्थित असतील. दहशतवादी हल्ल्यांसोबतच या बैठकीत 29 जूनपासून सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकताच यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांना प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि तेथील दहशतवादी घटनांनंतर उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देण्यात आली. गेल्या चार दिवसांत दहशतवाद्यांनी रियासी, कठुआ आणि दोडा जिह्यात चार ठिकाणी हल्ले केले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या या हल्ल्यांमध्ये जीवितहानी होत असल्याने गृह मंत्रालयाने आता दहशतवाद्यांविरोधात कठोर धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही बाब गंभीरपणे घेत सुरक्षा दलाला मोकळीक दिली आहे. त्यांनी लष्कराला दहशतवादी कारवायांना पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यात एका ण्Rझ्इ व्यतिरिक्त नऊ यात्रेकरू ठार झाले आहेत.

 अमरनाथ यात्रेची तयारी

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पोलिसांनी दोन महिन्यांच्या अमरनाथ यात्रेची तयारी सुरू केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांना विद्यमान सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यास, पाळत ठेवण्याचे धोरण सुधारण्यास सांगितले आणि त्यांनी तैनाती वाढविण्याचे निर्देश दिले. मार्गावरील कर्मचाऱ्यांना त्यांनी यात्रेच्या मार्गांवर विशेष पथके तैनात करून संभाव्य धोका कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भाविकांची योग्य काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असून योग्य सज्जताही केली जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article