कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाय हिल्सवर शहरात बंदी

06:43 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलांमध्ये हाय हिल्स सँडल्स अत्यंत लोकप्रिय आहेत. हे सँडल्स ग्लॅमरस लुक मिळवून देतात. याचमुळे केवळ रॅम्प वॉकवर नव्हे तर महिलांना अन्य प्रकारच्या समारंभांमध्ये देखील सँडल्स वापरताना पाहिले असेल. अनेक युवती तर हाय हिल्स सँडल्सचे कलेक्शन बाळगतात. परंतु जगातील एका शहरात हाय हिल्स सँडल्स वापरण्यापूर्वी परवाना घ्यावा लागतो.

Advertisement

Advertisement

कार्मेल-बाय-द-सी कॅलिफोर्नियामध्ये छोटे शहर असून तेथे येणाऱ्या लोकांना दोन इंचापेक्षा अधिक उंचीची हिल वापरायची असल्यास शासकीय परवाना मिळविणे आवश्यक आहे. कार्मेल-बाय-द-सीमध्ये परवान्याची ही कहाणी सध्या चर्चेत आहे. हील्स दोन इंचापेक्षा अधिक उंचीचे असल्यास आणि एक चौरस इंचापेक्षा कमी सहनशील पृष्ठभाग असल्यास शहराच्या हॉलमधून परवाना प्राप्त केल्याशिवाय ते सार्वजनिक स्वरुपात वापरणे अवैध आहे. परवाना मोफत प्रदान केला जातो आणि अनेक पर्यटक याला केवळ एक स्मृतिचिन्ह म्हणून मिळवितात. परवाना अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जारी केला जातो आणि सेवेत असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून त्यावर स्वाक्षरी केली जाते.

कार्मेल-बाय-द-सीच्या रस्त्यांवर हाय हील्स वापरणे अवैध ठरविणारा कायदा 1963 मध्ये शहराच्या अॅटर्नीच्या मागणीवर संमत करविण्यात आला होता. हा कायदा त्यावेळीही विचित्र वाटत होता, परंतु यामागे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. कॅलिफोर्नियातील हे शहर अनेक सायप्रस आणि मोंटेरे पाइन्सचे घर असून यातील अनेक प्रभावशाली आकारापर्यंत वाढली आहेत. परंतु जसजशी वृक्ष मोठे होत गेले, त्यांची मूळं देखील वाढली, काँक्रिटचे फुटपाथ यामुळे वर उचलले गेले, यामुळे चालताना लोक पडण्याचा धोका वाढला.

..यामुळे कायदा लागू

अनियमित फुटपाथवर हाय हिल्स वापरल्याने पडण्याचा धोका वाढतो. कुठलीही महिला दुर्घटनेची शिकार ठरू नये आणि मग पालिकेवर खराब रस्त्यांवरून खटला दाखल करू नये, म्हणून शहराच्या अॅटर्नींनी हा कायद्याची मागणी केली होती. याचमुळे परवान्याचा नियम लागू करण्यात आला होता. पोलीस या कायद्याला मानत नाही, परंतु जर कुणी परवान्याशिवाय पकडली गेल्यास तिला तुरुंगात जावे लागणार नाही. पण दुर्घटनेनंतर ती शहराच्या पालिकेवर खटला दाखल करू शकणार नाही. तसेच पालिकेचे उत्तरदायित्व संपुष्टात येईल. काही वर्षांपूर्वी पर्यंत कार्मेल-बाय-द-सीमध्ये डाउनटाउन सीमांच्या आत आइस्क्रीम खाण्यावर बंदी घालणारा एक कायदाही होता. आइस्क्रीम सांडून फुटपाथ घाण होऊ नयेत असे लोकांना वाटत होते.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article