For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime दीड तासात 14 तोळे दागिन्यांवर डल्ला राजेंद्रनगर येथील घटना, चोरटा सीसीटीव्हीत कैद चोरटा माहीतगार असण्याची शक्यता

07:58 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
kolhapur crime दीड तासात 14 तोळे दागिन्यांवर डल्ला राजेंद्रनगर येथील घटना  चोरटा सीसीटीव्हीत कैद चोरटा माहीतगार असण्याची शक्यता
Advertisement

प्रतिनिधी कोल्हापूर
राजेंद्रनगर येथे बंद घराचा कडीकोयंडा उचकटून 14 तोळे दागिन्यांसह रोख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात श्वेता वैभव देवकर (वय 35, रा. साक्षी रेसिडेन्सी, राजेंद्रनगर) यांनी दिली आहे.

Advertisement

श्वेता देवकर यांचे पती वैभव देवकर हे सांगली येथील एका बँकेत नोकरीस असून, ते आई, पत्नी, मुलासोबत राजेंद्रनगर येथील साक्षी रेसिडेन्सीमध्ये मजल्यावर राहतात. बुधवारी सायंकाळी वैभव हे पत्नी, मुलासोबत भाजी खरेदी आणण्यासाठी मंडईत गेले होते. तर त्यांची आई दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नातेवाईकांकडे गेली होती.

रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घराचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन बघितले असता, कपाटातील 14 तोळे दागिने आणि रोख 18 हजार रुपये लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली.
याप्रकरणी शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

Advertisement

माहीतगाराचे कृत्य
घटनेची माहीती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक संशयित अलिशान मोटारीतून आल्याचे तपासात समोर आले. फ्लॅटमध्ये अन्य कोठेही साहित्य विस्कटण्यात आले नव्हते. संशयिताने थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटातील दागिने आणि रोकड लंपास केली. यामुळे संशयित माहितगार असल्याचा प्राथमिक अंदाज राजारामपुरी पोलिसांनी व्यक्त केला.

गेलेला मुद्देमाल
14 तोळे सोने, रोख 18 हजार यात पाच तोळ्याचे मंगळसूत्र, चार तोळ्याचा बकुळी हार, अडीच तोळ्याची धनेमाळ, दीड तोळ 4 झुमके, एक तोळ्याची एक अंगठी, तीन ग्रॅमची सोन्याची चेन एक ग्रॅमची बाली, रोख 18 हजार रुपये असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

Advertisement
Tags :

.