For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिडकल धरणग्रस्तांचा नवीन प्रस्ताव पाठविणार

11:16 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिडकल धरणग्रस्तांचा नवीन प्रस्ताव पाठविणार
Advertisement

जिल्हा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय : शेतकऱ्यांचे मंगळवारीही दिवसभर आंदोलन : आश्वासनानंतर आंदोलन मागे

Advertisement

बेळगाव : हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांकडून पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात सोमवारपासून सुरू असलेले आंदोलन मंगळवारी सायंकाळी सात वाजता मागे घेण्यात आले. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पाटबंधारे खात्याचे अधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारला नवीन प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले. हिडकल जलाशयामध्ये 45 वर्षांपूर्वी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली नव्हती. 394 एकर जमिनीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत मास्तीहोळी, बिरनहोळी यांसह इतर गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी चन्नम्मा चौकात दोन तास धरणे आंदोलन करून क्लब रोडवरील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला होता. सोमवारी दिवसभर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारीही आंदोलन जारी ठेवले होते. जनावरे कार्यालयाच्या आवारात बांधून जेवण तयार करून वसतीचे आंदोलन हाती घेतल्याने जिल्हा प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.

शनिवारपर्यंत प्रस्ताव पाठविण्यावर संमती

Advertisement

मंगळवारी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईसंदर्भात नवीन प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारपर्यंत प्रस्ताव पाठविण्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली आहे. लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. तत्पूर्वी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Advertisement
Tags :

.