For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वनांमध्ये लपवताहेत सोने

06:22 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
वनांमध्ये लपवताहेत सोने
Advertisement

युरोप खंडातील नॉर्वे या देशातील अनेक लोकांना सध्या एका विचित्र सवयीने  ग्रासलेले आहे. हे लोक सोने खरेदी करतात आणि ते वनप्रदेशांमध्ये लपवून ठेवतात. असे केल्याने या सोन्याची चोरी होणार नाही आणि कालांतराने त्याची किंमत वाढेल आणि आपल्याला मोठा आर्थिक लाभ होईल, अशी त्यांची समजूत आहे. तथापि, या समजुतीमुळे त्यांची मोठी फसवणूक होत आहे. त्यांच्यावर पाळत ठेवून काही ठग त्यांची सोने लपविण्याची जागा शोधून काढतात आणि त्या सोन्यावर डल्ला मारतात. त्यामुळे सोने सुरक्षित राहण्याऐवजी त्याची चोरी होत आहे. काही लफंग्यानी तर नवीच युक्ती शोधली आहे. हे लफंगे लोकांना सोन्यात गुंतवणूक करण्याच्या मोहात पाडतात. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ते सोने वनप्रदेशांमध्ये विशिष्ट स्थानी लपविण्याची सूचना करतात आणि नंतर त्या सोन्याची चोरी करतात. अनेकांजण अशा प्रकारे फसलेले आहेत. असे अनेक प्रकार या देशाची राजधानी ओस्लो आणि इतर शहरांमध्ये उघडकीस आले आहेत. आतापय्त 850 कोटी रुपयांचे सोने अशाप्रकारे चोरीला गेल्याची माहिती दिली जाते. तथापि, आता तेथील प्रशासन आणि बँकांनी वेळीच कृती करुन जवळपास 1 हजार 300 कोटी रुपयांचे सोने चोरी होण्यापासून वाचविले आहे. तथापि, मुख्य प्रश्न लोक असे फसतात कसे, हा आहे. नॉर्वे हा 100 टक्के साक्षरतेचा देश आहे. येथील अनेक लोक केवळ सुशिक्षित आहेत असे नव्हे, तर ते उच्चशिक्षितही आहेत. तरीही त्यांना सोन्याचा मोह पडतो आणि ते लफंग्यांवर विश्वास ठेवून सोने त्यांच्या सूचनांप्रमाणे लपवितात, याचे या देशातील समाजशास्त्र आणि मानसशास्त्रतज्ञांना आश्चर्य वाटते. भारतात असे फसवणुकीचे प्रकार घडतात तेव्हा लोकांच्या अज्ञानाकडे बोट दाखविले जाते. पण नॉर्वेसारख्या प्रगत देशातही हे घडताना दिसते.

Advertisement

Advertisement
Tags :

.