महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड येथील बसथांब्यात अडगळीचे साहित्य

10:37 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नंदगड : नंदगड येथील कोंडवाड्याजवळील बसथांबा कुचकामी बनला आहे. या बसथांब्यात प्रवासी माणसाअभावी आता अज्ञातांनी आपले अडगळीचे साहित्य ठेवले आहे. त्यामुळे हा बसथांबा कुणासाठी हाच प्रश्न जनतेला पडला आहे. या बसथांब्यात बाटल्या, लाकडी साहित्य ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे साहित्य पडून आहे. याच बसथांब्यासमोर गतवर्षी नव्याने बसथांबा बांधण्यात आला आहे. त्यामुळे जुना बसथांबा कुचकामी बनला आहे.

Advertisement

नवीन बसथांब्यासमोर अस्वच्छता

Advertisement

येथे नव्याने बसथांबा बांधण्यात आला आहे. मात्र या बसथांब्यासमोर गवत वाढले आहे. त्यातच कचरा पडल्याने हा बसथांबा गैरसोयीचा ठरला आहे. नंदगड गावातील प्रवासी खानापूर बेळगावला जाण्यासाठी जीन्या बसथांब्याऐवजी एखाद्या दुकानासमोर उभे राहून बसची प्रतीक्षा करताना तर नंदगडहून हलशी, हलगा, मेरडा व कापोली, घोटगाळी भागात जाणाऱ्या प्रवासी वर्गाचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे नवा व जुना बसथांबा असूनही अस्वच्छतेमुळे कुचकामी ठरले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article