महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये गुप्त कॅमेरा

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

300 व्हिडिओ-फोटो लीक : विद्यार्थिनींकडून निदर्शने : आरोपी विद्यार्थ्याला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/कृष्णा

Advertisement

आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात गुडीवाडा येथील इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा आढळून आला आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता याबाबत वृत्त समोर येताच कॉलेजमध्ये गोंधळ सुरू झाला. या कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडिओ रिकॉर्ड केले जात होते. जे नंतर लीक करून काही जणांना विकण्यात आले होते. पोलिसांनुसार लीक करण्यात आलेलया फोटो-व्हिडिओंची संख्या सुमारे 300 इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुडीवाडाच्या गुडलावलेरु कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील बीटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी विजय कुमारला अटक केली आहे.

त्याचा फोन तसेच लॅपटॉप देखील जप्त करण्यात आला आहे. गुडलावलेरु कॉलेज ऑफ इंजिनियरिंगला याविषयी एक आठवड्यापूर्वी कळविण्यात आले होत, परंतु कॉलेजने याप्रकरणी कुठलेच पाऊल उचलले नव्हते. गुरुवारी विद्यार्थिनींनी निदर्शने सुरू केल्यावरही कॉलेज हे प्रकरण दडपू पाहत होते.  हा प्रकार कॉलेजबाहेर समजू नये म्हणून गेटही बंद करण्यात आले होते. परंतु विद्यार्थिनींनी रात्री उशिरापर्यंत निदर्शने केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी करत त्याला ताब्यात घेतले आहे.

प्रेयसीला केले ब्लॅकमेल

आरोपी विजयने गर्ल्स वॉशरुममध्ये कॅमेरा लपविण्यासाठी कॉलेजच्या एका विद्यार्थिनीची मदत घेतल्याचे बोलले जात आहे. ही विद्यार्थिनी कोण होती हे पोलीस किंवा कॉलेज प्रशासनाने अद्याप उघड केलेले नाही. परंतु सोशल मीडियावर विजयसोबत एका विद्यार्थिनीचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या विद्यार्थिनीनेच वॉशरुममध्ये कॅमेरा लपविला होता असा दावा करण्यात येत आहे. ही विद्यार्थिनी विजयची प्रेयसी होती आणि विजय तिला ब्लॅकमेल करत होता असे सांगण्यात येत आहे. विजयने ओयो रुममध्ये प्रेयसीचा व्हिडिओ तयार करत तिला ब्लॅकमेल केले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गतिमान तपासाचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article