रविवारपेठ येथील हायटेक स्वच्छतागृहाचे आज लोकार्पण
12:13 PM Oct 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : रविवारपेठ येथे उभारण्यात आलेल्या हायटेक पे अॅण्ड युज टॉयलेटचे बुधवार दि. 8 रोजी लोकार्पण केले जाणार आहे. असे प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी कळविले असून सकाळी 11 वाजता हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये यापूर्वी असलेले स्वच्छतागृह जीर्ण झाले होते. त्यामुळे रविवारपेठ येथील व्यापारी, हमाल व इतरांना समस्यांना तोंड देण्याची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेत नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी तेथील जुने स्वच्छतागृह पाडून नवीन स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार स्वच्छ भारत व महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हायटेक स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले आहे. बुधवारी हायटेक पे अॅण्ड युज टॉयलेटचे लोकार्पण केले जाणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article