हिजबुल्लाहचा सर्वोच्च नेता हमादीची लेबनॉनमध्ये हत्या
घराबाहेर गोळीबार, इस्रायलवर हत्येचा आरोप
वृत्तसंस्था/ बैरुत
लेबनॉनमधील हिजबुल्लाहचे एक सर्वोच्च नेते शेख मुहम्मद अली हमादी यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. ते बेका व्हॅलीमधील ते आपल्या घराबाहेर थांबलेले असताना दोन वाहनांमधून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हमादी यांना अनेक गोळ्dया लागल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. गोळीबारानंतर अज्ञात हल्लेखोर पळून गेले असून स्थानिक प्रशासन घटनेची चौकशी करत आहे.
हमादीच्या हत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही. तसेच अद्याप कोणीही त्याची जबाबदारी घेतलेली नाही. ही हत्या राजकीय नसून कौटुंबिक वाद त्यामागील कारण असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, काही दाव्यांमध्ये या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचेही म्हटले जात आहे. हिजबुल्लाहने अद्याप या हत्येबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील युद्धबंदीची अंतिम मुदत संपत असताना ही हत्या झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात 60 दिवसांचा युद्धविराम करार झाला. हा करार 25 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. ही युद्धबंदी आणखी वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे.
हमादी एफबीआयच्या वॉन्टेड यादीत होता. एफबीआय बऱ्याच काळापासून हमादीचा शोध घेत होते. 1985 मध्ये पश्चिम जर्मन विमानाच्या अपहरण प्रकरणात तो हवा होता. 13 ऑक्टोबर 1985 रोजी पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या चार दहशतवाद्यांनी पश्चिम जर्मनीहून उ•ाण करणाऱ्या अमेरिकन ‘टीडब्ल्यूए फ्लाइट 847’ चे अपहरण केले होते. या विमानात 148 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.