For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिजबुल्लाहचा रॉकेट हल्ला, इस्रायलमध्ये 12 ठार

06:43 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिजबुल्लाहचा रॉकेट हल्ला  इस्रायलमध्ये 12 ठार
Advertisement

खेळणाऱ्या मुलांवर बॉम्ब टाकल्याने इस्रायल संतप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

गोलान टेकड्यांवर लेबनॉनच्या हिजबुल्लाहकून अनेक रॉकेट्स डागण्यात आली आहेत. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. मृतांचे वय 10-20 वर्षांदरम्यान आहे. 7 ऑक्टोबर रोजी लढाई सुरू झाल्यापासून हिजबुल्लाहने केलेला हा सर्वात मोठा हल्ल असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. लेबनॉनमध्ये डागण्यात आलेल्या रॉकेट्स गोलान टेकड्यांच्या उत्तर ड्रुज शहर मजदल शम्समधील एका फुटबॉल मैदानात कोसळली होती. या हल्ल्यानंतर इस्रायल आता हमाससोबत हिजबुल्लाह विरोधात लढाई सुरू करणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

तर दुसरीकडे हिजबुल्लाहने रॉकेट्स डागली नसल्याचा दावा केला आहे. इस्रायलचे सैन्य आणि हिजबुल्लाह मागील 10 महिन्यांपासून परस्परांना लक्ष्य करत आहेत. सुमारे 20 हजार ड्रूज अरब गोलन हाइट्स येथे राहतात. इस्रायलने 1967 च्या 6 दिवसांच्या युद्धादरम्यान सीरियाकडून हा भूभाग मिळविला होता. आंतरराष्ट्रीय कायदे आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या अंतर्गत याला कब्जायुक्त भाग मानले जाते. या क्षेत्रात जवळपास 50 हजार इस्राली ज्यू आणि ड्रूज यांची घरं आहेत. बहुतांश ड्रूज स्वत:ला सीरियन मानतात.

रॉकेट हल्ल्यावेळी मुले मैदानात खेळत होती. 7 ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असून आम्ही कारवाई करणार आहोत. हा हल्ला फलाक 1 इराणी रॉकेट्सद्वारे करण्यात आला आहे. हिजबुल्लाहकडूनच हल्ला झाला असल्याचे आयडीएफचे प्रवक्ते डेनियल हगारी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.