हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचे समभाग 745 वर सूचीबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा लिस्टिंग समारंभ राष्ट्रीय शेअर बाजारात पार पडला. यामध्ये हेक्सावेअरचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात 745.5 वर सूचीबद्ध झाले, जे इश्यू किमतीपेक्षा 5.29 टक्के जास्त आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा समभाग 731 वर सूचीबद्ध झाला आहे. जो त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 3.25 टक्के अधिक आहे. हेक्सावेअरच्या आयपीओची इश्यू किंमत 708 होती. आयपीओ 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान बोलीसाठी खुला होता, जो एकूण 2.79 पट सबक्राइब झाला होता. आयपीओ रिटेल श्रेणीमध्ये 0.11 वेळा, पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) श्रेणीमध्ये 9.55 वेळा आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीमध्ये 0.21 वेळा सबक्राइब झाला.
किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 273 समभागांसाठी बोली लावू शकत होते. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजने आयपीओची किंमत 708 निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी म्हणजेच 23 समभागांसाठी बोली लावू शकत होते. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज ही एक जागतिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी आहे. जगभरातील 19 हून अधिक देशांमध्ये तिची 61 कार्यालये आहेत. कंपनीकडे 31,000 कर्मचारी आहेत आणि 370 हून अधिक क्लायंट आहेत.