For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हरडाऊनमुळे हेस्कॉमची सेवा कोलमडली

12:08 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हरडाऊनमुळे हेस्कॉमची सेवा कोलमडली
Advertisement

सोमवारी कार्यालयात शुकशुकाट : सेवा बंद असल्याने नागरिकांवर पुन्हा माघारी फिरण्याची वेळ

Advertisement

बेळगाव : हेस्कॉम कार्यालयात सर्व्हरडाऊनची समस्या उद्भवल्याने सोमवारी सकाळपासून सर्व कामकाज ठप्प होते. नवीन कनेक्शनची रक्कम भरण्यासोबत इतर सर्व कामे ठप्प झाल्याने कार्यालयात आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. यामुळे दिवसभर हेस्कॉमच्या रेल्वेस्टेशनसमोरील व नेहरुनगर येथील कार्यालयात शुकशुकाट पहावयास मिळाला. संपूर्ण राज्यभर सर्व्हरडाऊन असल्यामुळे कार्यालयातील कामकाज धिम्यागतीने सुरू असल्याचे उत्तर दिले जात होते.

दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव्या घरांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. नव्या घरात जाण्यापूर्वी विजेचे कनेक्शन मिळावे यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. परंतु हेस्कॉम कार्यक्षेत्रातील कार्यालयांचे सर्व्हरडाऊन असल्यामुळे सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. सर्व्हरविना हेस्कॉमचे कोणतेच कामकाज चालत नसल्याने सोमवारी कर्मचाऱ्यांनाही रिकामी बसावे लागले.

Advertisement

महिन्यातून किमान आठ ते दहा दिवस सर्व्हरडाऊनची समस्या उद्भवत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता संपूर्ण राज्यभर सर्व्हरडाऊन असल्याचे सांगून हातबलता व्यक्त केली. तातडीने कनेक्शन हवे असणाऱ्यांनाही सर्व्हरमुळे काही दिवस वाट पहावी लागत आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी असून सकाळ-संध्याकाळ कार्यालयाचे उबंरठे झिजवावे लागत आहेत.

Advertisement
Tags :

.