महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेस्कॉमच्या सर्व्हरडाऊन समस्येमुळे नागरिकांची धावपळ

11:45 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सणासुदीच्या दिवसात असुविधेमुळे संताप

Advertisement

बेळगाव : ऐन सणासुदीच्या काळात हेस्कॉमचा सर्व्हरडाऊन झाल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दिवाळीपूर्वी नवीन घर तसेच फ्लॅटचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना हेस्कॉमचे सर्व्हरडाऊन असल्यामुळे नवीन कनेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. परंतु, पुढील पंधरा दिवस सर्व्हर नसल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांमधून हेस्कॉमच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

राज्यातील सर्वच वीज वितरण कंपन्यांमध्ये सर्व्हरची समस्या निर्माण झाली आहे. हेस्कॉमसोबतच बेस्कॉम, चेस्कॉम, मेस्कॉम, जेस्कॉममध्येही सर्व्हरडाऊन झाला असल्याने सर्वच यंत्रणा ठप्प आहे. कोणत्याही प्रकारचे पेमेंट घेता येत नसल्याने नवीन कनेक्शनसोबतच जुन्या कनेक्शनवरील लोड वाढविणे, लोड कमी करणे, नावातील बदल, मीटरचे स्थलांतर यासह इतर सर्वच कामांना खो बसल्याने नागरिक संतापले आहेत.

बेळगावमध्ये मागील आठवडाभरापासून सर्व्हर नसल्याने हेस्कॉम कार्यालय ओस पडले आहे. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घरे, फ्लॅट, नवीन बांधकाम करणाऱ्यांची कनेक्शन मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. मान्यताप्राप्त कंत्राटदारांकडे त्यांनी आपली सर्व कागदपत्रे देऊनदेखील केवळ सर्व्हरडाऊनमुळे कनेक्शन मिळत नसल्याने हेस्कॉमच्या कारभाराविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांना फटका 

एकीकडे प्रत्येक सरकारी विभाग डिजिटल करण्याचा प्रयत्न होत असताना हेस्कॉममधील सर्व्हर मात्र मागील दोन वर्षांपासून योग्यरित्या कार्यरत नसल्याने नागरिकांना फटका बसत आहे. सर्व्हर नसल्यास कोणतेच काम होत नसल्याने विनाकारण कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याने सर्व्हरची समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी केली जात आहे. हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व्हर डाऊन असणार असल्याची माहिती देण्यात आली असल्याने तोपर्यंत नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article