For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंत्राटी कामगारांवर हेस्कॉमचा डोलारा

10:43 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंत्राटी कामगारांवर हेस्कॉमचा डोलारा
Advertisement

कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट : वेतन, भत्ते परवडत नसल्याने कंत्राटी पद्धतीने कामगार

Advertisement

बेळगाव : एकीकडे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असताना दुसरीकडे सरकारी विभाग मात्र कंत्राटी कामगारांवर अवलंबून आहे. हेस्कॉमचा डोलारा कंत्राटी कामगारांवरच अवलंबून असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील काळात कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांना दिले जाणारे भत्ते व सुविधा या परवडणाऱ्या नसल्याने राज्य सरकारचे अनेक विभाग कंत्राटी पद्धतीने कामगार घेत आहेत. यामध्ये हेस्कॉम आघाडीवर आहे. मीटर रिडींग, मेंटेनन्स, दुरुस्ती, ड्रायव्हर यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत. कंत्राटी भरती केली जात असल्याने कायमस्वरुपी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या युवकांच्या पदरी निराशा पडत आहे. हेस्कॉमने मागील काही वर्षांपासून मीटर रिडींग करण्याचे काम कंत्राटी पद्धतीने दिले आहे. निविदा काढून कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जाते. मीटर रिडींग सोबतच आता शहरातील 24×7 सुविधेमध्येही कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने मागील वर्षी प्रत्येक उपकेंद्राला आठ कंत्राटी कर्मचारी दुरुस्ती व इतर कामांसाठी देण्यात आले. परंतु, कायमस्वरुपी कर्मचारी भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 केवळ 50 टक्केच कामगार कायमस्वरुपी

Advertisement

हेस्कॉमला ड्रायव्हर व वाहनांचा खर्च यांची देखभाल हे परवडत नसल्याने कंत्राटी पद्धतीने वाहने घेतली आहेत. या कंत्राटमध्ये वाहनाचा दैनंदिन खर्च तसेच चालकाचा खर्चही नमूद करण्यात आला आहे. यामुळे हे कामगारही कंत्राटी पद्धतीनेच घेण्यात आल्याने हेस्कॉममध्ये केवळ 50 टक्केच कामगार कायमस्वरुपी असल्याची बाब दृष्टीस पडत आहे.

Advertisement
Tags :

.