For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेरवाडकर, सेंट पॉल्स विजयी

10:32 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेरवाडकर  सेंट पॉल्स विजयी
Advertisement

सर्वोदय, सेंटमेरीज, चिटणीस, केएलई सामने बरोबरीत

Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत एम. व्ही. हेरवाडकर संघाने कनक मेमोरियल संघाचा, सेंटपॉल्सने केएलएसचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. केएलईने चिटणीसला तर सेंट मेरीजने सर्वोदयला शुन्य बरोबरीत रोखले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने कनक मेमोरियल संघाचा  1-0 असा निसटता पराभव केला.

या सामन्यात 15 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या ऋषभ बल्लाळने गोल करण्याची संधी दडवली. 19 व्या मिनिटाला कनकच्या प्रवीणने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे दोन्ही संघाचे गोलफलक कोरेच राहिले. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला ऋषभ बल्लाळच्या पासवर अथर्व नाकाडीने गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी हेरवाडकरला मिळवून दिली. त्यानंतर कनकने गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते असफल ठरले. दुसऱ्या सामन्यात जी. जी. चिटणीसला केएलई इंटरनॅशनल संघाने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते अफसल ठरले.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात सेंट मेरीजला सर्वोदय खानापूर संघाने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्याने बरोबरीला सामोरे जावे लागले. चौथ्या सामन्यात सेंटपॉल्सने केएलएसचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटाला अंकुश अलकुंटीच्या पासवर स्वयंम नाईकने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला निकोलोस फर्नांडीसच्या पासवर ईशान देवगेकरने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला केएलएसच्या प्रणव लाडने गोल करण्याची संधी हुकविली. 36 व्या मिनिटाला स्वयंम नाईकच्या पासवर अंकुश अलकुंटीने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली.

शुक्रवारचे सामने 

  • भरतेश वि. हेरवाडकर दुपारी 2 वा.
  • मुक्तांगण वि. केएलएस दुपारी 3 वा.
  • महिला विद्यालय वि. सेंट मेरीज दुपारी 4 वा.
  • केएलई इंटरनॅशनल वि. ज्ञानप्रबोधन सायंकाळी 5 वा.
Advertisement
Tags :

.