महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेरवाडकर, जैन, एमव्हीएम, मदनी, सेंट मेरीजची विजयी सलामी

10:10 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : फ्रेंडस् फुटबॉल क्लब आयोजित रौप्य वर्षानिमित्त निमंत्रीतांच्या आंतर शालेय फायु-ए-साईड फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी हेरवाडकर, जैन हेरिटेज, एमव्हीएम, सेंट झेवियर्स, मदनी, सेंट मेरीज तर महाविद्यालयीन स्पर्धेत अंगडी, चंदगड संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. किक फ्लेम टर्फ मैदानावरती आयोजित फायु-ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मॅन्युअल डिव्रुज, मानस नायक, अमिन पिरजादे, अभिषेक शेरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित संघांच्या खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शालेय विभागात पहिल्या सामन्यात हेरवाडकर संघाने भरतेशचा 3-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जैन हेरीटेज आणि सेंटपॉस या सामन्यात दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा वापर केला. यामध्ये जैन हेरिटेजने 3-2 असा पराभव केला.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात एमव्हीएम अ संघाने ज्योती सेंट्रल संघाचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला. चौथ्या सामन्यात एमव्हीएमने सेंट झेवियर्सचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात मदनी संघाने केएलई इंटरनॅशनल टायब्रेकरचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. सहाव्या सामन्यात सेंट मेरिजने केएलई ब संघाचा 1-0 असा निसटता पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश मिळविला. महाविद्यालयीन स्पर्धेत पहिल्या सामन्यात अंगडी संघाने भरतेशचा 3-2 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात केआरएम चंदगड संघाने केएलई संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. पुढील सामने शनिवारी खेळविण्यात येणार असून रात्री उशीरा अंतिम सामने खेळविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article