For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हिरोची शक्तिशाली दुचाकी मेव्हरीक लाँच

06:36 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरोची शक्तिशाली दुचाकी मेव्हरीक लाँच

रोडस्टर बाईकमध्ये 440 सीसी सिंगल सिलेंडर

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

हिरोमोटो कॉर्प दुचाकींचा इव्हेंट ‘हिरो वर्ल्ड 2024’ जयपूरमध्ये नुकताच पार पडला. यामध्ये कंपनीने आपली सर्वात शक्तिशाली आणि फ्लॅगशिप दुचाकी हिरो मेव्हरीक 440 सादर केली आहे. यासह हिरोने मध्यम श्रेणीतील एक्सट्रीम 125 आर यांचेही सादरीकरण केले आहे. या मॉडेलची भारतीय बाजारात सुरुवातीची किंमत ही 95,000 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु मेव्हरीकच्या किंमतीचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र यांचे बुकिंग फेब्रुवारीत व वितरण एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisement

गाडीला ट्यूबलर स्टाइल हँडल बार, वक्र इंधन टाकी आणि सिंगल सीट आहे. यामध्ये एलईडी इंडिकेटरसह संपूर्ण एलईडी लाइटिंग आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी डिस्प्ले यासारखी आधुनिक वैशिष्ट्यो आहेत. आगामी बाईकमध्ये स्पोर्टी टँक आच्छादनांसह मजबूत टँक आहे.

Advertisement

इंजिन आणि कामगिरी

हार्ले डेव्हिडसन एक्स440 सारखेच इंजिन मेव्हरीकमध्ये वापरले गेले आहे. मात्र, त्यात किरकोळ बदल दिसू शकतात. हे 440सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन 47 बीएचपी पॉवर आणि 37एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

Advertisement
Tags :
×

.