For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवण गल्लीत 2 लाखांचे हेरॉईन जप्त

08:03 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बसवण गल्लीत 2 लाखांचे हेरॉईन जप्त
Advertisement

सीसीबीची कारवाई, मुंबईत आणला साठा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अमलपदार्थांची विक्री करणाऱ्याविरोधात कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. बसवाण गल्ली येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हा साठा आपण मुंबई येथील सायन कोळीवाडा येथून आणल्याची कबुली त्या तरुणाने दिली आहे.

Advertisement

गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. संदीप विजय अनगोळकर (वय 27, रा. बसवाण गल्ली) या तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे 10.77 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

122 पुड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संदीपवर गुरुवारी रात्री उशिरा येथील खडेबाजार पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायन कोळीवाडा येथील अम्माने हा साठा आपल्याला दिल्याची कबुली संदीपने दिली आहे. मुंबईतून हेरॉईन आणल्यानंतर विक्रीसाठी त्याने त्याच्या पुड्या बांधल्या होत्या.

बसवाण गल्ली येथील आपल्या घरी संदीपने हा साठा ठेवला होता. संदीपबरोबरच सायन कोळीवाडा येथील अम्मावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. बेळगाव शहर व तालुक्यात हेरॉईन, पन्नी, गांजा विक्री करणाऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून त्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

Advertisement
Tags :

.