For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरो 3 जून रोजी पहिली फ्लेक्स फ्युएल बाईक लॉन्च करणार

07:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिरो 3 जून रोजी पहिली फ्लेक्स फ्युएल बाईक लॉन्च करणार
Advertisement

नवी दिल्ली : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प आता भारतात फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानासह एक मोटरसायकल लॉन्च करणार आहे. कंपनी 3 जून रोजी आपली पहिली फ्लेक्स फ्युएल बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिरो मोटोकॉर्प देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. या लॉन्च कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.