हिरो मोटोचा युकेमध्ये प्रवेश
नवी दिल्ली :
भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी युनायटेड किंगडममध्ये (युके) प्रवेश केला आहे. भारतातील हिरो मोटाकॉर्पची 51 व्या आंतरराष्ट्रीय देशामध्ये कंपनीची सुरूवात होत असून तेथे मोटोजीबी यांच्यासोबत भागीदारीतून वाहन विक्रीवर कंपनी भर देणार आहे. कंपनी या बाजारामध्ये आपली नवी हिरो 5+ ही गाडी सादर करणार आहे. साधारपणे दोन आठवड्याच्या आत कंपनीने तिसरी मोठी बाजारपेठ असणाऱ्या युरोपातील बाजारात प्रवेश केला आहे. मागच्या आठवड्यात कंपनीने स्पेनमध्ये प्रवेश केला होता. तेथे नोरीया मोटर्स यांच्यासोबत कंपनी संयुक्तपणे व्यवसाय करणार आहे. कंपनीने यापूर्वी इटलीमध्ये सुद्धा प्रवेश केला असून युरोपातील बाजारामध्ये कंपनी आपला व्यवसाय अधिक विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
? युके 51 वा देश
? मोटोजीबीचे घेणार सहकार्य
? स्पेननंतर तिसरी मोठी बाजारपेठ