For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हिरो मोटोकॉर्पची येणार अनोखी दुचाकी

06:05 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरो मोटोकॉर्पची येणार अनोखी दुचाकी

हिरो वर्ल्ड 2024 कार्यक्रमात सादर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिरो मोटोकॉर्प या वाहन निर्मिती कंपनीने एक नवी अनोखी दुचाकी सादर केली आहे, जी तीनचाकीमध्ये बदलली जाऊ शकते. या गाडीचा टिझर नुकताच  प्रदर्शित झाल्याने या गाडीबाबत भारतात चर्चा होताना दिसते आहे.

Advertisement

गाडीचे नाव ‘सर्ज’ असे ठेवण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हिरो कंपनीने जयपूरमध्ये आयोजीत हिरो वर्ल्ड 2024 मध्ये एस 32 मल्टीपर्पज तीनचाकी वाहनाचे मॉडेल सादर केले आहे. हे वाहन तीनचाकी असून त्याचबरोबर दुचाकीप्रमाणेदेखील वापरता येण्याची सोय आहे. सदरची दुचाकी ही काही मिनिटातच तीनचाकीमध्ये बदलता येणार असल्याची सोय करण्यात आली आहे. या वाहनावर पुढील सीटवरती दोन जणांना बसता येणार आहे पण जेव्हा ही गाडी दुचाकीमध्ये बदलते तेव्हा मात्र नेहमीच्या स्कूटरप्रमाणेच मागे बसण्याची सोय होऊ शकणार आहे.

Advertisement

तीन मिनीटात होणार काम

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तिचाकीचे रुपांतर दुचाकीमध्ये करण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. एकंदर चार प्रकारांमध्ये सदरचे वाहन कंपनी सादर करणार आहे.

Advertisement
Tags :
×

.