For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरो मोटोकॉर्पची दुचाकी विक्रीत आघाडी

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिरो मोटोकॉर्पची दुचाकी विक्रीत आघाडी
Advertisement

मे महिन्यातील विक्री घोषित : होंडाने पटकावले दुसरे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दुचाकी वाहन निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्पने मे 2026 मध्ये सर्वाधिक दुचाकी विक्री करण्याचा विक्रम प्राप्त केला आहे. कंपनीने सदरच्या महिन्यात 5 लाख 36 हजार 784 इतक्या दुचाकींची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. वर्षाच्या आधारावर विक्रीत 9 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. मागच्या वर्षी समान महिन्यात 4 लाख 88 हजार 997 दुचाकींची विक्री झाली होती. डिलक्स 125 सीसी मोटरसायकलच्या वाढत्या मागणीमुळे दुचाकी विक्री वाढीव राहिली आहे. यापाठोपाठ दुचाकी विक्रीत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, टीव्हीएस मोटर कंपनी, बजाज ऑटो, सुझुकी मोटरसायकल इंडिया व रॉयल इनफिल्ड यांचा नंबर लागतो.

Advertisement

होंडा दुसऱ्या स्थानी

होंडा ही दुचाकी विक्रीत दुसऱ्या नंबरवर राहिली आहे. मेमध्ये 4 लाख 59 हजार 611 दुचाकींची विक्री केली असून 10 टक्के वाढ नोंदवलीय. मागच्या वर्षी याच महिन्यात 4 लाख 17 हजार 250 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती.  टीव्हीएसने 3 लाख 84 हजार 565 दुचाकींची विक्री केली असून मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्री 24 टक्के वाढीव दिसली आहे. मोटरसायकल व स्कूटर्स यांना ग्राहकांची दमदार मागणी राहिली होती. बजाजने मे महिन्यात 2 लाख 9 हजार 528 दुचाकींची विक्री केली होती, जी मागच्या तुलनेत 9 टक्के अधिक आहे. 1 लाख 91 हजार 412 इतक्या दुचाकींची विक्री मागच्या वर्षी मेमध्ये करण्यात आली होती. याचदरम्यान सुझुकीने 1 लाख दुचाकी विक्रीचा टप्पा पार केला आहे. देशांतर्गत विक्रीत 2 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर रॉयल इनफिल्डने मे महिन्यात 94,115 दुचाकींची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. मे 2025 मध्ये कंपनीने 75,820 दुचाकींची विक्री केली होती, त्या तुलनेत यंदा 24 टक्के वाढली आहे.

Advertisement
Tags :

.