हिरो मोटोकॉर्प दोन स्वस्त स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
कंपनी बाजारपेठेतील हिस्सेदारी वाढविणार : ओला, अॅथर, बजाज यांच्यासोबत स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
fिहरो मोटोकॉर्प दोन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करण्याची तयारी करत आहे. जुलैमध्ये त्या लाँच केल्या जाऊ शकतात. याद्वारे कंपनीला आपली बाजारातील हिस्सेदारी वाढवायची आहे. यांच्या दुचाकी विदा स्कूटर ओला, अॅथर, बजाज सारख्या कंपन्यांच्या स्कूटरशी स्पर्धा करतील. कंपनी सध्या दरमहा सुमारे 7,000 इलेक्ट्रिक वाहने तयार करते. ऑटोकारमधील एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की हिरो मोटोकॉर्प विडा व्ही2 आणि एसीपीडी (कमी किमतीच्या आवृत्ती) सह दरमहा 13,000-15,000 युनिट्सच्या एकत्रित व्हॉल्यूमची अपेक्षा करत आहे. 2025 च्या सणासुदीच्या हंगामापर्यंत ही संख्या 20,000 युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
या दोन गाड्या केल्या होत्या लाँच
हिरोने 4 डिसेंबर 2024 रोजी विदा व्ही2, विदा व्ही1 ची अपडेटेड आवृत्ती, लाँच केली. कंपनीने तीन प्रकारांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन श्रेणी सादर केली यामध्ये व्ही2 लाइट, व्ही2 प्लस आणि व्ही2 प्रो-व्ही2 लाइट, व्ही2 प्लस आणि विदा व्ही 2 श्रेणीची किंमत 96,000 रुपयांपासून सुरू होते, जी टॉप प्रकार व्ही2 प्रो साठी 1.35 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरसह 5 वर्षे किंवा 50,000 किमीची वाहन वॉरंटी देत आहे, तर बॅटरी पॅकवर 3 वर्षे किंवा 30,000 किमीची वॉरंटी आहे.
व्ही2 प्रो प्रकाराला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 94 किमीची रेंज मिळते. नवीन हिरो व्हिडा व्ही2 इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी इलेक्ट्रिक स्कूटर विभागात एथर रिझ्टा, एथर 450एक्स, ओला एस1 रेंज, बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते.