हिरो ‘विडा’ नवीन रेंज व्ही2 लाँच
सुरुवातीची किंमत 96,000 रुपये : पूर्ण चार्जवर 165 किमी पर्यंत धावणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पची उपकंपनी असलेल्या विडाने नुकतेच भारतात तिच्या इलेक्ट्रिक स्कूटर विडा व्ही 1 ची अद्ययावत आवृत्ती विडा व्ही2 लाँच केली आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन श्रेणीतील व्ही2 लाइट व्ही2 प्लस आणि व्ही2 प्रो या तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. व्ही लाइट हा नवीन प्रकार कंपनीने आणला आहे. विडा व्ही 2 रेंजची सुरुवातीची किंमत 96,000 रुपये आहे, जी व्ही2 प्रोच्या टॉप मॉडेलसाठी 1.35 लाख रुपयांपर्यंतही जाते. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरसह 5 वर्षे किंवा 50,000 किमीची वाहन वॉरंटी दिली आहे. तसेच बॅटरी पॅकची 3 वर्षांसाठी किंवा 30,000 किमीची वॉरंटी दिली आहे. कंपनीने दावा केला आहे, की व्ही प्रो मॉडेल एका पूर्ण चार्जवर जवळपास 94 किमी रेंज मिळणार आहे. नवीन हिरो विडा व्ही2 इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये अॅथर रिझटा, अॅथर 450 एक्स, ओला एस1 रेंज, बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत स्पर्धा राहणार आहे.