येथे मिळते अमर होण्याचे इंजेक्शन
धनाढ्यांची लागते रांग, बिटकॉइनने होते पेमेंट
ईश्वराची उपासना करून अमर होण्याचे वरदान मागणाऱ्या राक्षसांची कहाणी तुम्ही बालपणी ऐकली असेल. या असुरांना कधीच पूर्णत्वाने अमरत्व प्राप्त होत नव्हते. प्राचीन काळापासून आतापर्यंत माणूस अमरत्वाच्या शोधात आहे. माणसाला मृत्यूपासून वाचण्याची इच्छा असते. आता याकरता विज्ञानाची मदत घेतली जात आहे. सद्यकाळात मोठमोठे धनाढ्या कशाप्रकारे स्वत:चे वय रोखण्याचे आणि एकप्रकारे मृत्यू पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या एका छोट्या बेटावर याचकरता काम सुरू असुन याविषयी फारशी कुणालाच माहिती नाही.
‘अमरत्वा’चे इंजेक्शन
होंडुरासच्या समुद्र किनाऱ्यापासून 40 मैलाच्या अंतरावर रोआटन नावाचे एक छोटे बेट आहे. या ठिकाणावर आरामात अमेरिकेतून फ्लाइटने पोहोचता येते. येथे प्रोस्पेरा नावाचे एक शहर असून ते एरिक ब्रिमेन यांनी वसविले होते. या ठिकाणी कर नाममात्र असून पेमेंट देखील बिटकॉइनमध्ये होते. कुठल्याही वैद्यकीय संघटनेकडून मंजुरी न मिळालेल्या सर्व अवैध मेडिकल ट्रीटमेंट येथे होत असतात. यातील एक असे इंजेक्शन आहे, ज्याद्वारे डीएनए मॉलिक्यूल्स शरीरात सोडले जातात आणि ते आपोआप रिपेयरिंग करत असल्याचा दावा केला जातो. साधारण भाषेत हे अमरत्वाचे इंजेक्शन असून ते संबंधिताला वृध्द होण्यापासून रोखणारे आहे.
श्रीमंतांचा मोठा ओढा
मिनिसर्कल क्लीनिककडून हे डीएनए इंजेक्शन दिले जाते, ज्याचे सर्वात प्रसिद्ध ग्राहक बायोहॅकर ब्रायन जॉन्सन राहिले आहेत. ब्रायन यांनी 2024 मध्ये हे इंजेक्शन घेतले होते आणि त्याचे सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला. परंतु अमेरिकेत ही ट्रीटमेंट अवैध असून एफडीएने याला मंजुरी दिलेली नाही. तरीही येथे इंजेक्शन 22 लाख रुपयांमध्ये दिले जात आहे. हे इंजेक्शन दोन वर्षांपयंत प्रभावी असल्याचा दावा करण्यात येतो. डेलावेयरमध्ये नोंदणीकृत बायोटेक स्टार्टअप मिनिसर्कलने ही जीन थेरपी फोलिस्टॅटिन प्रोटीनद्वारे संबंधिताच्या शरीराच्या कार्याला प्रभावित केले जाऊ शकते असे म्हटले आहे. तसेच याच्या माध्यमातून एजिंग स्पीड 0.64 पॉइंट स्लो होतो, म्हणजेच 12 महिन्यांचे वय 19 महिन्यांमध्ये वाढते.