Reel star Rohini Paradhye | पती हॉटेलबाहेर बसला होता अन् आत तिने...; प्रसिद्ध रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येने सोलापूर हादरलं!
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या निधनाने मंगळवेढा हादरला
सोलापुर - सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातल्या ब्रम्हपुरीमध्ये 25 वर्षीय रीलस्टार रोहिणी पाराध्येने मंगळवारी (26 मे 2026) गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेने संपुर्ण सोलापुरसह राज्याला हादरवुन सोडले...रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे दोघेही इंस्टाग्रामवरील त्यांच्या रिल्समुळे लोकप्रिय होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत, नेहमी दोघे आपले हॉटेल ग्रामपंचायतला सांभाळत रील करत असत... त्यांच्या रीलला लोक पंसत देखील करत होते..
मंगळवारी रोहिणीने (26 मे 2026) रोजी गळफास लावून आत्महत्या केली, ज्यावेळी रोहिणीने गळफास घेतला त्यावेळी निलेश हॉटेल बाहेर बसलेला होता. त्याचवेळी तिने किचनमध्ये गळफास घेतल्याची बातमी समोर आली त्यानंतर तिला तातडीने मंगळवेढा येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
नेहमी हसत खेळत रील करणारी रोहीणीने असे अचानक टोकाचे का पाऊल उचलंले हा प्रश्न अनेकांना पडला आहे... . रोहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावडण्याच्या वेळी रोहिणी आणि निलेशच्या कुटुंबातील कुटुंबीय हजर होते. या दुःखद प्रसंगात सगळेच एकमेकांना धीर देत होते. मात्र, कुठलातरी कारणांवरून काही नातेवाईकांमध्ये वाद झाला. उपस्थित लोकांनी दोन्ही गटांची समजूत काढली. मात्र, वाद वाढला. त्यामुळे स्मशानभूमीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती समोर आली आहे.
रोहिणी पाराध्येने का उचलले टोकाचे पाऊल ?
रोहिणी आणि तिचा पती निलेश यांचा प्रेमविवाह होता. आंतरजातीय विवाह करून दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्यास होते. तिथे असतानाच दोघेही रील करू लागले. त्यांच्या मजेशीर रील सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाल्या. नंतर आपल्या मूळ गावी परतल्यावर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावानं व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. याच काळात मंगळवेढा तालुक्यातच दोघांनी हॉटेलच्या नव्याने दोन शाखा सुरू केल्या. मात्र दोन्ही शाखांचा व्यवस्थापन, आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगली चालवणं अशी तारेवरची कसरत होत होती . परिणामी दोघांमध्ये वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.