महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लखनौ संघात हेन्रीचा समावेश

06:33 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सध्या सुरु असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ संघाने इंग्लंचा अष्टपैलू डेव्हिड विलीच्या जागी आता मॅट हेन्रीला स्थान देण्याचे ठरविले आहे. लखनौ संघाने हेन्रीला 1.25 कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले आहे.

Advertisement

आयपीएल स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या लखनौ संघामध्ये यापूर्वी विलीचा समावेश करण्यात आला होता. पण काही वैयक्तिक समस्येमुळे विलीने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय लखनौच्या संघ व्यवस्थापनाला कळविला असल्याने लखनौने न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. 2022 आणि 2023 च्या आयपीएल स्पर्धेत डेव्हिड विलीने आरसीबीचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या मार्क वूडने अधिक ताणामुळे या स्पर्धेतून माघार यापूर्वीच घेतली आहे. मार्क वूडच्या जागी लखनौ संघाने विंडीजच्या एस. जोसेफला संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने 2017 साली आयपीएल स्पर्धेत दोन सामने खेळले होते. 32 वर्षीय हेन्रीने 25 कसोटी, 82 वनडे आणि 17 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना एकूण 256 गडी बाद केले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article