महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हेमंत सोरेन होणार झारखंडचे मुख्यमंत्री

06:40 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चंपाई सोरेन यांचा राजीनामा : हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

झारखंडमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची धुरा हेमंत सोरेन यांच्याकडे येणार आहे. जामिनावर मुक्त झाल्यानंतर आता पुन्हा ते राज्याचे नेतृत्त्व करणार आहेत. चंपाई सोरेन यांनी बुधवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. तथापि, राज्यपालांनी अद्याप शपथविधीची तारीख आणि वेळ दिली नसल्याची माहिती हेमंत सोरेन यांनीच राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिली.

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांची महाआघाडी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत ही निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. तथापि, चंपाई सोरेन यांनी रांची येथे झालेल्या महाआघाडी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. चंपाई सोरेन यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला असला तरी पक्ष आणि राज्यात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

अंमलबजावणी संचालनालयाने हेमंत सोरेनला 31 जानेवारी रोजी एका जमिनीवर कब्जा केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. अटकेपूर्वी सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाले होते. आता झारखंड उच्च न्यायालयाने 28 जून रोजी हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करतानाच प्रथमदर्शनी सोरेन या प्रकरणात दोषी दिसत नसल्याची टिप्पणी केली होती. न्यायालयाच्या या पवित्र्यानंतर गेल्या दोन-चार दिवसात राज्यात राजकीय घडामोडी गतिमान झाल्या. त्यानुसार हेमंत सोरेन यांच्याकडे पुन्हा नेतृत्त्व देण्यावर एकमत झाल्याने चंपाई सोरेन यांना पायउतार व्हावे लागले.

हेमंत सोरेन तुऊंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली होती, अशी माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या सूत्रांनी दिली आहे. हेमंत सोरेन यांच्या बाजूने समर्थकांची संख्या मोठी असल्याने विधिमंडळ पक्ष आघाडीच्या बैठकीत हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री बनविण्यावर सहमती झाली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हेमंत सोरेन यांच्या नावावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article