महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेमंत सोरेन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

06:22 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन तुरुंगातून मुक्तता झाल्यावर पहिली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी दिल्लीचा दौरा करत पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तुरुंगातून मुक्तता झाल्यावर सोरेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेली ही पहिलीच भेट आहे. उच्च न्यायालयाने सोरेन यांना भूमी घोटाळ्याप्रकणी जामीन मंजूर केला होता, यानंतर 28 जून रोजी सोरेन हे तुरुंगातून बाहेर पडले होते.

पंतप्रधान मोदी आणि सोरेन यांच्यात झारखंडच्या विकासावरून चर्चा झाल्याचे मानले जात आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर हेमंत सोरेन यांनी चंपई सोरेन यांच्या जागी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन आता राज्यातील विकासकामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करू इच्छितात आणि याकरता त्यांना केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे.

झारखंडमध्ये चालू वर्षातच विधानसभा निवडणूक होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे झारखंडचे मोठे नुकसान झाले आहे. अशास्थितीत सोरेन आता पायाभूत प्रकल्पांपासून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रीत करू इच्छितात.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article