महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय पंच परिक्षेत हेमंत हावळ, नूर मुल्ला उत्तीर्ण

10:23 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : चेन्नई येथे इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन आयोजित राष्ट्रीय स्तरीय शरीरसौष्ठव पंच परिक्षेत बेळगावचे हेमंत हावळ व नूर अहमद मुल्ला हे उत्तीर्ण झाले. सदर परिक्षेत संपूर्ण भारतातून जवळपास 60 हून अधिक शरीरसौष्ठव पंचांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव हेमंत हावळ व नूर अहमद मुल्ला यांनी राज्यस्तरीय विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धातून पंचगिरीचे काम पाहिले होते. त्यांनी केलेल्या अचूक निर्णयाची दखल घेऊन इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशनने राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी मान्यता दिली होती. या परीक्षेत त्यांनी उत्तीर्ण होऊन पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. त्यांना बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी व कर्नाटक राज्य असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डरचे कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्धण्णावर व प्रकारश पुजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article