कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातील टॉप थर्टी हेअर स्टायलिस्टमध्ये 'हेमंत'

02:45 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / विद्याधर पिंपळे : 

Advertisement

व्यक्तीच्या लाईफ स्टाईलमध्ये आकर्षक व्यक्तिमत्व व मॅचिंगचा ट्रेड वाढत चालला आहे. यामध्ये हेअर स्टाईल मुद्दा महत्वाचा ठरू लागला आहे. नुकत्याच देशपातळीवर झालेल्या, हेअर स्टाईल स्पर्धेमध्ये, कोल्हापूरातील सलून व्यावसायिक हेमंत काशीद यांने टॉप 30 फायनलिस्टमध्ये निवड झाली आहे. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाईट या राष्ट्रीय पातळीवरील हेअरस्टायलिस्ट स्पर्धेमध्ये कोल्हापूरला हा प्रथमच मान मिळाला आहे.

Advertisement

आपले कपडे, वागणे, बोलणे, सौंदर्य, दागिने हे बदलू शकते. पण डोक्यावरील केस आपण बदलू शकत नाही. केसाची स्टाईल बदलण्याची ताकत फक्त हेअर स्टायलिस्टमध्येच असते. सेलिब्रिटी, मॉडेल्स यांच्या केसाची स्टाईलसुध्दा फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन ठरत आहे. बदलत्या ट्रेडनुसार हेअर स्टाईलमध्ये 35 ते 40 नवनवीन हेअर स्टाईल्स आल्या आहेत. यामध्ये लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतर स्टाईलबरोबर व्यक्तींच्या हेअरस्टाईल ही बदलू लागल्या आहेत. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट हेअरस्टायलिस्ट स्पर्धेत राजारामपुरी येथील इमेज सलूनचे हेमंत काशीद टॉप 30 फायनलिस्टमध्ये निवडले गेले आहेत.

देशात सहा दशलक्षाहून अधिक सलून आहेत. भारताचा सलून उद्योग हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. तरीही प्रतिभावन हेअर स्टायलिस्ट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा अभाव होता. हा प्लॅटफॉर्म गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटमुळे हेअर स्टायलिस्टला मिळाला आहे. ते प्रतिभावान केशरचनाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची संधी देत आहे. या उपक्रमाद्वारे, स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधीसह हेअर स्टायलिस्टला सक्षम करण्याचे ध्येय आहे.

कोल्हापूरसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. केसांचा रंग तसेच केसांची निगा राखण्यासाठी याचे आयोजन केले होते. यासाठी नामवंत कंपन्यांचे कॉस्मेटीक, तसेच खर्च करण्याची तयारीमुळे लोक खर्च करण्यासाठी मागे नाहीत. मुंबईत झालेल्या या महाअंतिम फेरीत देशभरातून निवडलेले 30 प्रतिभावान सहभागी झाले होते. प्रत्येक फायनलिस्टने रॅम्पवर क्युरेटेड हेअर कलर कलेक्शनचे देखणे सादरीकरण केले होते. सहभागी हेमंतने हेअर कलर्सचे उत्तम प्रदर्शन करून तिसाव्रामांक पटकावला.

आज युवक-युवतींच ओघ बदलत्या हेअर स्टाईलकडे वाढत आहे. आकर्षक व्यक्तिमत्वामध्ये हेअर स्टाईल महत्वाची ठरत आहे. 35 ते 40 प्रकारच्या हेअर स्टाईल्स आहेत. आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार हेअर स्टाईल केली जात आहे. लॉग हेअर स्टाईलमध्ये, बटर फ्लाय, कर्टन बचींग, फेस फ्रेमिंग, लॉब तर शॉर्ट हेअर स्टाईलमध्ये मुलेट, क्विफ, राऊंड लेअर स्टाईल लोकप्रिय ठरत आहे.

हेअर स्टाईल काळाची गरज बनली आहे. देशस्तरावर कॉस्मेटीक कंपन्या या स्पर्धां घेऊ लागल्या आहेत. आजपर्यंत यात मेट्रो शहरांचा दबदबा होता. पण आता प्रथमच या स्पर्धेंमध्ये कोल्हापूरचे नाव झळकले आहे. हेअर स्टाईलमध्ये कोल्हापूर सुध्दा, हम भी कुछ कम नही, हे दाखवून दिले आहे.

                                                                                                                -हेमंत काशिद, कोल्हापूर

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article