For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्रीचा डंका कायम

04:40 PM Jan 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्रीचा डंका कायम
Advertisement

दिल्लीत झालेल्या स्पर्धेत प्रथम येत पटकावले सुवर्णपदक

Advertisement

ओटवणे| प्रतिनिधी
दिल्ली फरीदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग बॅच प्रेस स्पर्धेत चराठा सावंतवाडी तालुक्यातील चराठा गावची कन्या तथा माजगाव हायस्कुलची विद्यार्थिनी कु हेमांगी गजानन मेस्त्री प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकाविले. या सुवर्णपदकामुळे हेमांगी हिने चराठा गावासह या प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल हेमांगी मेस्त्री हिच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.कु हेमांगी मेस्त्री ही माजगाव शिक्षण सहायक संस्था संचलित श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत असुन तिने यापूर्वी अनेक जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत कु हेमांगी मेस्त्री हिने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते. हेमांगी हिला कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंगचे अध्यक्ष श्री. सरदेसाई, सचिव संजय साटम, प्रशिक्षक मंगेश घोगळे व व्यायामशाळा प्रशिक्षक अबित कित्तूर यांचे मार्गदर्शन मिळाले. हेमांगी ही सावंतवाडी होमगार्डचे पलटन नायक गजानन मेस्त्री यांची कन्या आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.