For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री द्वितीय

03:45 PM Jan 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु  हेमांगी मेस्त्री द्वितीय
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
सोलापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५ किलो वजन उचलत द्वितीय क्रमांक पटकावला.कु. हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिच्या उज्वल यशाबद्दल तिचे कोच मंगेश घोगळे तसेच श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.