For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ तरुणांच्या कुटुंबीयांना पाच-पाच लाख रुपयांची मदत

10:19 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ तरुणांच्या कुटुंबीयांना पाच पाच लाख रुपयांची मदत
Advertisement

झाड कोसळून ठार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना आधार

Advertisement

वार्ताहर /किणये

दुचाकीवरून गवंडी कामाला जात असताना बेळगुंदी स्मशानभूमीजवळ झाड कोसळून कर्ले गावातील दोन तरुण ठार झाले. तर एक जण जखमी झाला होता. घरातील कर्ते चिरंजीव ठार झाल्यामुळे सदर गावातील कुटुंबातील सदस्य हतबल झाले होते. त्यांना प्रशासनामार्फत पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बुधवारी त्यांना या पाच लाख रुपयांचे आदेशपत्र सुपूर्द करण्यात आले.

Advertisement

दि. 9 जून रोजी कर्ले गावाहून बेळगुंदीमार्गे उचगावला गवंडी कामासाठी सोमनाथ राहुल मुचंडीकर, विठ्ठल कृष्णा तळवार व स्वप्नील देसाई हे तरुण दुचाकीवरून जात होते. बेळगुंदी स्मशानभूमीजवळ दुचाकीवर झाड कोसळून यामध्ये सोमनाथ मुचंडीकर हा जागीच ठार झाला तर विठ्ठल तळवार याचाही त्या दिवशी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्लेतील दोन तरुण ठार झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना पाच पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

मंत्री हेब्बाळकरांकडून मदत सुपूर्द

बुधवारी सकाळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या दोन्ही तऊणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना पाच लाख ऊपयांचे आदेशपत्र सुपूर्द करण्यात आले. त्या मयत तऊणांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या खात्यावर सदर रक्कम जमा होणार आहे. या भेटीप्रसंगी तहसीलदार बसवराज नागराळ, महसूल निरीक्षक राजू गलगली, युवराज कदम, तलाठी एम. एच. बुद्धीहाळ उपस्थित होते. गावातील ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, वसंत सांबरेकर, शंकर गोवेकर, रंजना भास्कर, अमृत खेमनाळकर, रणकुंडये ग्रामपंचायत सदस्य भरमानी पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.