For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाडमध्ये हेलिकॉप्टरला अपघात !

01:20 PM May 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महाडमध्ये हेलिकॉप्टरला अपघात
Advertisement

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Advertisement

रायगड । प्रतिनिधी

महाड ( जि. रायगड) शहराजवळ एक किलोमीटर अंतरावर मोकळ्या जागेत आज सकाळी ९.३० च्या सुमारास हेलिकॉप्टरचे लँडिंग होत असताना अपघात घडला. सदरचे हेलिकॉप्टर शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या श्रीमती सुषमा अंधेरे यांना नेण्यासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे.  शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या श्रीमती सुषमा अंधारे या काल (गुरुवारी) रात्री महाड येथे प्रचार सभेसाठी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी  रोहा येथे प्रचार सभे करिता जाणार होत्या, त्यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना क्रॅश झाले. या हेलिकॉप्टर मधून सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ आणि पायलट असे तिघेजण प्रवास करणार होते. यामध्ये तिघेही सुखरूप असून ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँडिंग झाले होते त्या ठिकाणी  प्रशासना कडून हेलिकॉप्टर लँडिंग करण्याकरता आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. याबाबत अधिक चौकशी करण्यात आल्यानंतर अपघात कशामुळे झाला याचे कारण समजणार आहे.हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर थोड्या वेळातच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाले, पुढील दुर्घटना घडू नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली दुर्घटनेनंतर त्वरित महाड औद्योगिक वसाहत व महाड नगरपालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले , सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.