महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी 2 फेब्रुवारी पासून

04:00 PM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
featuredImage featuredImage
Advertisement

2 ते 7 फेब्रुवारी पर्यंत आयोजन

Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

आचरावासियांमध्ये उत्साह निर्माण करणारी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारीची तारीख जाहीर झाली असून रविवार २ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ती संपन्न होणार असल्याचे देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी आणि देवस्थान समिती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मालवण तालुक्यातील जागृत आणि प्राचीन शिवस्थानामुळे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. येथील सण उत्सव संस्थानी थाटात साजरे होत असतात. अशाच प्रकारे दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी या वर्षी श्रींच्या कौल प्रसादाने रविवार २ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. रविवार २ फेब्रूवारीला सकाळी रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी डाळपस्वारीला बाहेर पडणार आहे.आचरा बाजारपेठ फुरसाई मंदिर येथील डाळप करून मिराशीवाडी ब्राम्हणदेव येथे भेट दिल्यानंतर सायंकाळी नागझरी गिरावळ मंदिर (पूर्वी आकारी)येथे विसावणार आहे. सोमवारी तीन फेब्रुवारी ला गिरावळ मंदिर येथे मुक्काम केला जाणार असून मंगळवार ४ रोजी दुपारनंतर डाळप आटोपून भंडारवाडी, बौद्धवाडी स्थळ येथील डाळप करुन सायंकाळी उशिरापर्यंत गाऊडवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे विश्रांती साठी थांबणार आहेत. रात्रीच्या विश्रांती नंतर बुधवार रोजी श्री ब्राम्हणदेव मंदिर येथून पांगेवाडी मंडप गाउडवाडी,जामडूल,पिरावाडी चव्हाटा मार्गे हिर्लेवाडी ब्राम्हणदेव मंदिरास भेट देऊन पहाटे पुन्हा गिरावळ मंदिराकडे येणार आहेत. गुरुवारी गिरावळ मंदिराकडे विश्रांती नंतर शुक्रवारी आचरा बाजारपेठ मार्गे नागोचीवाडी ब्राम्हणदेव ,पारवाडी ब्राम्हणदेव मंदिराकडील डाळप करून रामेश्वर भेटीनंतर पहाटे पर्यंत देवूळवाडी गांगेश्वर मंदिरा कडे स्थिरावणार आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #