For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हीरो उद्योगसमूह अध्यक्षांच्या मालमत्तेवर टाच

06:37 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
हीरो उद्योगसमूह अध्यक्षांच्या मालमत्तेवर टाच
Advertisement

25 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त : आयातशुल्क चुकविल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सुप्रसिद्ध हीरो उद्योसमूहाचे अध्यक्ष पवन कांत मुंजाळ यांच्या साधारणत: 25 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर प्रवर्तन निर्देशनालयाने (ईडी) टाच आणली आहे. शुक्रवारी केलेल्या या कारवाईत ईडीने मुंजाळ यांची दिल्लीतील 3 निवासस्थाने ताब्यात घेतली आहेत. मुंजाळ यांच्यावर आयातशुल्क चुकविल्याचा आरोप आहे.

Advertisement

त्यांच्यावर विदेशी चलन बेकायदेशीररित्या भारताबाहेर नेल्याचाही आरोप आहे. राजस्व गुप्तचर संचालनालयाने त्यांच्या विरोधात तक्रार सादर केली होती. या तक्रारीच्या आधारावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी 54 कोटी रुपयांचे परकीय चलन बेकायदेशीररित्या देशाबाहेर नेल्याचा आरोप राजस्व गुप्तचर विभागाने आपल्या अन्वेषणानंतर ठेवला होता. त्यानुसार ही कारवाई झाली.

इतरांच्या नावे घेतले चलन

पवन कांत मुंजाळ यांनी इतर लोकांच्या नावे परकीय चलनाची खरेदी केली होती. मात्र, नंतर त्यांनी हे चलन स्वत:च्या विदेश दौऱ्यांमध्ये स्वत:च्या कारणांसाठी खर्च केले. उद्योजगांच्या सोयीसाठी विदेशी चलनासंबंधीचे नियम केंद्र सरकारने शिथील केले आहेत. या शैथिल्याचा दुरुपयोग मुंजाळ यांनी केला. त्यांनी अनेक लोकांच्या माध्यमातून पद्धतशीरपणे प्रतिवर्ष 2.5 लाख रुपयांचे विदेशी चलन खरेदी केले. विदेशी चलन खरेदी करण्याच्या निश्चित मर्यादेचा त्यांनी अनेकदा भंग केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यांची चौकशी अद्यापही होत आहे.

पूर्वीही मौल्यवान वस्तूंवर जप्ती

या कारवाईच्या आधीही मुंजाळ यांच्या निवासस्थानांवर धाडी पडल्या होत्या. त्या धाडींमध्ये ईडीने त्यांच्याकडून साधारणत: 25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. अशा प्रकारे त्यांची एकंदर 50 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत ईडीने आपल्या ताब्यात घेतली असून हे प्रमाण वाढू शकते.

Advertisement
Tags :

.