For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव ग्रामीण भागात भर उन्हातही चुरशीने मतदान

10:12 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव ग्रामीण भागात भर उन्हातही चुरशीने मतदान
Advertisement

सकाळच्या सत्रात गर्दी : महिला-तऊणांचा उत्साह : कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर गर्दी ओसरली

Advertisement

वार्ताहर /किणये

लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मंगळवारी शांततेत आणि चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. सुरुवातीला संथगतीने तर सकाळी आठ ते नऊ वाजल्यानंतर वेग वाढला होता. सकाळपासूनच महिला पुऊष आणि तऊणांची मतदान केंद्रावर गर्दी वाढली होती. विशेषत: द़रंगी आणि तिरंगी लढत असलेल्या ग्रामीण भागात मतदार संघात मतदारांचा अमाप उत्साह दिसून आला. सकाळी सात ते नऊ या वेळेत कामगार वर्ग व पुऊषांची गर्दी अधिक प्रमाणात दिसून आली तर काही भागात सकाळी 11 नंतर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात  होती. कडक उन्हाच्या चटक्यामुळे दुपारी एक ते तीन या दोन तासांच्या दरम्यान बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदान करणाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात दिसून आली. मंगळवारी सकाळी सात वाजता सर्रास मतदान केंद्रांवर पूजा करून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. किणये गावात दोन बूथ आहेत. यामध्ये 126 बूथ क्रमांकमध्ये सकाळी साडेदहा वाजेपर्यंत 201 पुऊषांनी मतदान केले होते. तर 192 महिलांनी मतदान केले होते. याच गावातील 127 बूथ केंद्रावर 836 पैकी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत 260 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

Advertisement

कर्लेत सकाळच्या सत्रात जोर

कर्ले गावात सकाळी अकरापर्यंत 1239 मतदारांपैकी 440 मतदारांनी मतदान केले होते. सकाळच्या सत्रात मतदान वाढले होते. तर दुपारी संथगतीने मतदान सुरू होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1029 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहाद्दरवाडी गावात दुपारी दीड वाजेपर्यंत 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. रणकुंडये गावात दुपारी दीडपर्यंत 1064 पैकी केवळ 380 इतकेच मतदान झाले होते. नावगे गावात सकाळी सात ते एकपर्यंत 324 पुऊषांनी मतदान केले. तर 334 महिलांनी मतदान केले होते. दुपारी एकपर्यंत एकूण 651 इतके मतदान झाले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या बेळगुंदी गावात दुपारी बारा वाजता 99 बूथवरती 620 पैकी 294 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तसेच याच मतदानावरती सकाळी सात ते नऊ या वेळेत 94 मतदारांनी मतदान केले होते. तर सकाळी नऊ ते 11 पर्यंत 220 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बूथ क्रमांक 102 वरती दुपारी बारापर्यंत 967 पैकी 501 मतदारांनी मतदान केले. बूथ क्रमांक 100 वरती दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत 358 मतदारांनी मतदान केले होते तर 101 वर 496 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

रणकुंडये गावात धिम्यागतीने मतदान

कावळेवाडी गावातील 664 मतदानापैकी सकाळी 11 वाजता 323 मतदारांनी मतदान केले होते. बिजगर्णी गावातील बूथ क्रमांक 113 वरती सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 87 मतदारांनी मतदान केले होते तर सकाळी नऊ ते अकरापर्यंत एकशे पन्नास जणांनी मतदान केले होते. सकाळी अकरा वाजून 45 मिनिटापर्यंत 114 वरती 110 पैकी 464 जण मतदान केले होते. रणकुंडये गावात अत्यंत धिम्यागतीने मतदानाची प्रक्रिया सुरू होती. साडेअकरा पर्यंत 1064 पैकी केवळ 380 इतके मतदान झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Advertisement
Tags :

.