कोकणातील अवजड वाहतुकींची ये- जा वाठारमार्गे
कोल्हापूर :
वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा शनिवार (12 एप्रिल) रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रत्नागिरी मार्गे कोल्हापूरात येणारी व कोल्हापूरातून जाणारी सर्व अवजड वाहतूक वाठार मार्ग बोरपाडळे कडे वळविण्यात येणार आहे. गुरुवार (10 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून हा बदल लागू करण्यात येणार असून, शनिवार मध्यरात्रीपर्यंत हा बदल राहणार आहे.

- डोंगरावर जाण्यासाठी मार्ग
- भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतीबा डोंगरावर जाणेस केर्ली, कुशिरे, वाघबीळ, गिरोली येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- शनिवारी सकाळी 5 वाजलेपासून सर्व दुचाकी वाहनांना जोतीबा डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग आणि जुने आंब्याचे झाड येथून वर तसेच गिरोली फाटा या ठिकाणावरुन प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- केर्ली किंवा कुशिरे गावावरुन येणाऱ्या सर्व मोटार वाहनांनी यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून ़ सामाजिक वणीकरण फाटा येथून गायमुख - जुने आंब्याचे झाड मार्गे जोतीबा डोंगरावर रवाना व्हावे आणि पार्किंगच्या नियोजित जागेमध्ये आपली वाहने पार्क करावीत.
- गिरोली किंवा यमाई कडून येणाऱ्या सर्व मोटार वाहनांनी यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळूऩ गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) येथून सरळ जोतीबा डोंगरावर रवाना व्हावे
- जोतीबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतुक दोन्ही मार्गाने चालू राहिल.
- डोंगरावरून उतरण्यासाठी
- देव दर्शन घेवून परत जाणाऱ्या ग्रामपंचायत, मेन पार्किंग व यमाई पार्किंग येथे पार्क असलेल्या वाहननांनी गिरोली मार्गे मार्गस्थ व्हावे.
- ट्रक ट्रॅक्टर पार्किंग ते नवीन एस टी स्टँड येथे पार्क असलेल्या वाहनांनी जुने आंब्याचे झाड ते गायमुख ते केर्ले मार्गे किंवा दानेवाडी क्रॉसिंग ते दानेवाडी फाटा ते वाघबिळ मार्गे मार्गस्थ व्हावे
- यात्रा संपलेनंतर जोतीबा डोंगरावरुन वाहने खाली उतरत असल्यामुळे दुपारी 4 पासून जोतीबा डोंगरावर जाणेस एस.टी. सह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पालखी सोहळा कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांनी दुपारी 4 पुर्वी जोतीबा डोंगरावर पोहचण्याची दक्षता घ्यावी.
- यात्रा संपल्यानंतर घाट उतरताना सर्व वाहने जुने आंब्याचे झाड येथून गायमुख मार्गे केलींकडे रवाना होतील.
- गिरोली फाटा येथून जाणारी सर्व वाहने सादळे मादळे मार्गे जातील तसेच यमाई पायरी पासुन वाहने दानेवाडी फाटा मार्गे वाघबीळकडे रवाना होतील.
- महत्वाची पार्किंग
- मेन पार्कीग : मंदीरकडे जाणारे बुमजवळ - सासन काठी राखीव
- सेंट्रल प्लाझा : ट्रक, ट्रॅवल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने, गिरोली मार्गे वाहनांसाठी
- चार चाकी वाहनांसाठी -
यमाई वळणावर, यमाई डावी बाजु, यमाई उजवी बाजु, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेलच्या पाठीमागे, श्रावणी हॉटेल के एम टी / बसस्टॉप च्या बाजुला, मातोश्री लॉजिंग डावी बाजु, यमाई पायरी जवळ क्र. 1, यमाई पायरी जवळ पार्किंग क्र. 2, यमाई पायरी समोर, निलगीरी बाग, निलगीरी बाग समोर क्र. 1, निलगीरी बाग समोर क्र. 2, लादे मळा, तीव्र वळणाच्या बोडीजवळ पडकी इमारत, दानेवाडी फाटा
- दुचाकी वाहनांसाठी
यमाई मंदिराच्या पाठिमागे, बुने फार्म हाऊस, श्रावणी हॉटेल च्या समोर
- केर्ली फाटा मार्गे येण्राया वाहनासाठी पार्किंग -
केर्लीं मार्गे येणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी
जुने एस टी स्टैंड समोर एमटीडीसी वळणावर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एसटी स्टँडच्या पिछाडीस, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 1, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 2, नवीन आंब्याचे झाड फार्म हाउस डावी बाजु, गायमुख इनाम पार्किंग, शेवताई
- दु-चाकी वाहनांसाठी
एम टी डी सी समोर, टोल नाक्याच्या बाजुला तळयाजवळ, नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस उजवी बाजु