महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुंजीनजीक नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन उलटले

08:38 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

रामनगरहून खानापूरकडे जाणाऱ्या एका भरधाव अवजड वाहनावरील चालकाचे  नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला उलटले. या अपघातात ट्रकचालक आणि क्लीनर सुदैवाने बचावल्याची घटना मंगळवारी पहाटे गुंजीनजीक घडली. मात्र ट्रकमध्ये असलेले चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले असून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेऊन पसार झाल्याचे समजते. ट्रकमध्ये चुनखडी भरलेली असून अपघातामुळे ती विखुरली आहे. सध्या या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. केवळ पंधरा दिवसापासून या महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू झाली असून, अवजड वाहने भरधाव धावत आहेत. पादचारी आणि दुचाकीधारकांना या भरधाव वेगामुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. सदर अपघातही वेगावर नियंत्रण नसल्यानेच झाला असून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article