For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर भररस्त्यात तलवारहल्ला

06:27 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर भररस्त्यात तलवारहल्ला
Advertisement

प्रकृती गंभीर : वातावरण तणावपूर्ण : लुधियाना बंदची हाक

Advertisement

वृत्तसंस्था/ लुधियाना

पंजाबमधील लुधियाना येथे शुक्रवारी दुपारी शिवसेना टकसाली नेते आणि सुखदेव थापर यांचे वंशज संदीप थापर यांच्यावर शस्त्रधारी निहंगांनी तलवारहल्ला केला. निहंगांनी भररस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असून शनिवारी लुधियानामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेणाऱ्या पथकाला मोठे यश मिळाले असून शुक्रवारी रात्रीच फतेहगड साहिब येथून हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Advertisement

अमर शहीद सुखदेव यांचे नातेवाईक संदीप थापर यांच्यावर पंजाबमधील लुधियाना येथे जीवघेणा हल्ला झाला. याचदरम्यान निहंगांच्या वेशात स्कूटरवरून आलेल्या चौघांनी तलवारीने हल्ला करत संदीप थापर यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात संदीप थापर रक्तबंबाळ होऊन पडले. त्यांना लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्याची सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

संदीप थापर उर्फ गोरा हे शिवसेना टकसाली संघटनेचे नेते आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ते लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संवाद ट्रस्टच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. ते बाहेर आले असता निहंगांनी त्यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला केला आणि नंतर दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी झालेल्या संदीप थापर यांना ऊग्णालयात दाखल केले.

सुनियोजित हल्ला

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, थापर यांच्यावरील हल्ला पूर्णपणे नियोजित होता. तीन निहंगांपैकी दोघे स्कूटरवर बसून राहिले तर दोघांनी खाली उतरून संदीप थापर यांच्यावर तलवारीने सपासप हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते खाली कोसळल्यावरही त्यांच्यावर आणखी वार करण्यात आले. घटनेच्या वेळी शेजारी बरेच लोक उपस्थित होते. मात्र नंग्या तलवारी पाहून पुढे जाण्याचे धाडस कुणीही दाखवू शकला नाही. हल्लेखोर थापर यांच्या छातीवर, खांद्यावर, डोक्मयावर आणि मानेवर तलवारीने वार करत असताना आजुबाजुच्या लोकांनी प्रतिकार न करता स्वत:चा बचाव करणे पसंद केले. हल्ल्यानंतर थापक रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर तेथून स्कूटरवरून पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

परिसरात तणाव वाढला, तपास पथके नियुक्त

हल्लेखोर निहंग पळून गेल्यानंतर जवळ उपस्थित असलेल्या लोकांनी प्रथम संदीप थापर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डीएमसी ऊग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त वाढवला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी अनेक पथकेही तयार केली आहेत.

Advertisement
Tags :

.